पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी आणि प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्रशाळा क्रमांक 2च्या इमारत दुरूस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले. या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.10) करण्यात आले.
उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, गणेश कडू, मनीषा बहिरा, सुजाता पाटील, अभिजीत मटकर, शिक्षणतज्ज्ञ सुनील म्हस्कर, माजी मुख्याध्यापक शंकर म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे भास्कर पाटील, राजू पाटील, मुख्याध्यापक संजय घरत, प्रेमलाल धोबी यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …