पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे मंगळवारी (दि. 6) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024चे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे, प्रो. डॉ. रजनीश के. कामत, संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत व प्रो. डॉ. रजनीश के. कामत यांच्या उपस्थितीत चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) व डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा करार ज्ञान सामायिक करण्यासाठी, संसाधनांचा वापर करण्याची संधी देईल आणि आमच्या महाविद्यालयीन कर्मचार्यांना व्यासपीठ प्रदान करेल. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई मध्ये चार सरकारी संस्थांचे क्लस्टर आहे. त्यामध्ये विज्ञान संस्था,एलफिस्टोन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय आणि बीएड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई यांचा समावेश आहे. या करारादरम्यान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, कुलसचिव डॉ. विलास पाध्ये, नोडल ऑफिसर डॉ. विशाल बनेवार, प्रा. डॉ. समाधान वाघमोडे, चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, कलाशाखेचे प्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्यशाखेचे प्रमुख प्रो. डॉ. एस. बी. यादव, विज्ञानशाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर आणि आय. क्यू. ए. सी. विभागाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा.जी.एस. साठे आदी उपस्थित होते.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …