पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहे. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळविला आहे. रविवारी (दि. 11) बारामती येथे त्यांचा थ्री स्ट्रीप्स व इप्युलेट (पदवीदान) समारंभ झाला. बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन अकॅडमी येथे झालेल्या या समारंभाला आमदार प्रशांत ठाकूर, भरतशेठ ठाकूर, पनवेल मनपाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रतिक ठाकूर, स्वप्नील ठाकूर, दीपक ठाकूर, विलास ठाकूर, संजय पाटील, राज ठाकूर, मानस ठाकूर, रोशन पाटील, राज पाटील, विक्रांत म्हसकर, ऋषीकेश ठाकूर, सागर ठाकूर, योगिता ठाकूर, रजनी ठाकूर, अनिता ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर आणि संपूर्ण ठाकूर परिवार उपस्थित होता. या वेळी सर्वांनी प्राप्ती यांचे कौतुक केले.