Breaking News

अयोध्येत जाणार्‍या रामभक्तांना पनवेल रेल्वेस्थानकात शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्री राम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. त्यामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील नागरीक या मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत आहेत. त्यापार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघामधील सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड येथुन आयोध्येत जाणारी रेल्वे शनिवारी (दि. 10) रात्री पनवेल स्थानकावर वरून निघाली. या वेळी सर्व श्रीराम भक्तांना भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या वतीने पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जेवण आणि पाणी देण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, पनवेल शहर महिला अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, उरणा तालुका अध्यक्ष रवी भोईर, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती अविनाश कोळी, भीमराव पोवार यांच्यासह मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

किल्ले रायगड शिवगर्जनेने दुमदुमला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर गुरुवारी (दि.6) 350वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या …

Leave a Reply