Breaking News

माथेरानमध्ये नव्याने दाखल होणार्‍या ई-रिक्षा हातरिक्षाचालकांना मिळतील -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत ः प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलावर्गाच्या सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे महिलाशक्तीला मोदी सरकार व भाजप करीत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलो असून माथेरानमधील नव्याने दाखल होणार्‍या ई-रिक्षा या स्थानिक हातरिक्षाचालकांनाच देण्यात येतील, असा विश्वास भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
माथेरान येथील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्ताने शनिवारी (दि.9) असेम्ब्ली हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल खेडकर, मनीषा केळकर, उपाध्यक्ष बीनिता घुमरे, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक अ‍ॅड. गायत्री परांजपे, नम्रता कांदळगावकर, भाजप माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी सभागृह नेते प्रसाद सावंत, नेरळ ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे, श्रद्धा कराळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सागर उसळला आहे. या महिलाशक्तीचा आवाज बुलंद करण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून महिलांना सन्मानाने जगण्यासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आहेत. महिलावर्गासाठी मातृ वंदन योजना, महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी निधीही देऊ केला आहे. नवीन जन्माला येणार्‍या बाळाच्या नावापुढे आईचे नाव लागणार आहे. त्यातून महिलांचा सन्मानच होत आहे. राज्यात महिला सक्षमीकरण योजना जाहीर केली आहे. महिलांच्या उद्योगांना आर्थिक बळ देण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. 2029मध्ये तर महिलावर्गासाठी खासदार आणि आमदार यांच्यासाठीदेखील आरक्षण राहणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान मोदींकडून नियोजन केले जात आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप माथेरान शहर महिला मोर्चाने केले होते. त्यात माजी नगरसेविका प्रतिभा घावरे, प्रियांका कदम, सुहासिनी शिंदे, संध्या शेलार, जयश्री कदम, जयश्री मालुसरे यांनी सहकार्‍यांसह पुढाकार घेतला. या वेळी माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीम आणि आबदा टीम यांना भाजप माथेरानकडून चार लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले. आबदा टीमचे दिनेश सुतार तसेच माथेरानचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांनी हे साहित्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्वीकारले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply