Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चिपळे, बोनशेत येथे विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तालुक्यातील चिपळे आणि बोनशेत येथे विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि.11) झाला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पनवेलमध्ये विकासाची अनेक कामे होत आहेत. त्यानुसार त्यांच्या स्थानिक विकास निधीतून चिपळे येथील एकनाथशेठ म्हात्रे यांचे फार्म हाऊस ते चिपळाई देवी मंदिर परिसर काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आणि जिल्हा वार्षिक योजनेतून बोनशेत येथील स्टॉपवर मोरी बांधणे या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांना भाजपचे नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, माजी उपसरपंच धनंजय पाटील, मुकेश फडके, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कान्हा फडके, दीपक फडके यांच्यासह हौशिराम फडके, तुकाराम धाऊ पाटील, विठ्ठल पाटील, विष्णू पाटील, मनोहर पाटील, संतोष पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, सुभाष पाटील, एकनाथ पाटील, भरत पाटील, सुनील फडके, समीर दिनकर पाटील, विशाल पाटील, अ‍ॅड. रोहित पाटील, समीर पद्माकर पाटील, ज्ञानेश्वर भगत, हभप विनोद पाटील, गणेश फडके, अनंता फडके, अ‍ॅड. सतीश फडके, दिनकर पाटील, शत्रुघ्न पाटील, शरद म्हसकर, जगदीश पाटील, विजय पाटील, अक्षय पाटील, प्रतीक फडके, संजय पाटील, प्रसाद पाटील, धीरज म्हात्रे, सतेज म्हात्रे, प्रणिल फडके, अजित म्हात्रे, सौरभ पाटील, समीर पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply