Breaking News

युनिफाईट स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड युनिफाईट असोसिएशनच्या वतीने पनवेलजवळील आकुर्ली येथील सेंट अ‍ॅण्ड्र्यूज इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी नवव्या रायगड जिल्हा युनिफाईट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेने 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि दोन कांस्य अशी 21 पदके जिंकून तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या खेळाडूंची 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी कराड येथे होणार्‍या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू खांदा कॉलनीतील आगरी शिक्षण संस्थेच्या एड्युकिडझ इंटरनॅशनल येथे सेन्सेई प्रतिक कारंडे यांच्याकडे कराटे आणि इतर मार्शल आर्टस्चे प्रशिक्षण घेत आहेत. युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र युनिफाईट संघटनेचे सचिव डॉ. मंदार पनवेलकर यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन करीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पदकविजेते खेळाडू : सुवर्ण ः आदित्य कापडोस्कर, अथर्व मसुरकर, कादंबरी बोराडे, श्रेया शिंदे, साक्षी केवट, ओम पिसाळ, पंक्ती पाठक, अलोकी पालवे, अनिरुद्ध खरात, विघ्नेश पाठक; रौप्य ः विवान कटियार, भार्गव भगत, रिया चव्हाण, हर्षद मेहेत्रे, अक्षयिनी मांजरेकर, श्रुती शिंदे, पिनांक्ती देशमुख, पल्लवी कणसे, शिवम केवट; कांस्य ः शर्वरी बनसोडे, स्मित पाटील.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply