आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात प्रचार करत आहेत, तर सोमवारी पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील गणपती मंदिरात पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मावळ मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महायुतीचा प्रचार करत आहेत. यानिमित्ताने दिवसभरातील प्रचाराच्या समाप्तीच्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रभाग 16 तील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून, घरोघरी प्रचार करण्याकरिता सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेवक समीर ठाकूर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेविका संगिता कांडपाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 19मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, संजय भगत, केदार भगत, संजय जैन, पवन सोनी, सपना पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.