Breaking News

पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
शाश्वत ऊर्जा पद्धतीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेलमधील कल्पतरू रिव्हरसाइड हाऊसिंग सोसायटीने सौरऊर्जा प्रणाली बसवली आहे. या प्रणालीचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी त्यांनी हा उपक्रम पनवेलच्या ग्रीनर फ्युचरसाठी योगदान देणार असल्याचे अधोरेखित केले.
कल्पतरू सोसायटीत बसवण्यात आलेली ही सौरऊर्जा प्रणाली 300 किलोवॅट क्षमतेची असून केवळ पनवेलमध्येच नाही, तर संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात मोठी आहे. हा प्रकल्प दाते इंजिनिअरिंगने तीन महिन्यांच्या विक्रमी वेळेत अंदाजे एक कोटी 20 लाख रुपयांमध्ये पूर्ण केला आहे. प्रकल्प दरमहा अंदाजे 36 हजार युनिट वीज निर्मितीसाठी सज्ज आहे. यामुळे वीज बिलांवर सुमारे 70 लाख रुपयांची वार्षिक बचत होणार आहे.
सौरऊर्जा प्रणालीच्या उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, कल्पतरू सोसायटीच्या 1 व 2 इमारतीचे अध्यक्ष प्रशांत बाळाराम ठाकूर, 3 व 4 इमारतीचे अध्यक्ष गुडापती ब्रह्माजी, मिलिंद कुलकर्णी, सचिव सतीश पिल्लई, विनित मित्तल, खजिनदार समर चौहान, उद्योगपती मनोज आंग्रे, वैभव देशमुख, भार्गव ठाकूर, विजय रेखी, दिलीप घरत, रवी म्हात्रे, संदीप साळुंके, पूजा सिंग, साक्षी पत्की, जिंदा दिलचे अध्यक्ष नितीन मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य आणि सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply