Breaking News

पनवेल वडाळे तलाव येथे महायुतीचा प्रचार

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करुन अबकी बार चारसो पारचा नारा दिला. देशाच्या तरुण पिढीचे भविष्य उज्वल करण्याचे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे तसेच आपला देश महासत्ता बनवण्याचे सामर्थ्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान, तर त्यांच्या रुपाने मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे विजयी करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यर्त्यांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहराच्या सौंदर्याचे प्रतीक असलेल्या वडाळे तलाव परिसरात महायुतीच्या वतीने श्रीरंग अप्पा बारणे यांचा रविवारी सायंकाळी प्रचार करण्यात आला तसेच येत्या 13 तारखेला होणार्‍या या लोकशाहीच्या उत्सावात सहभागी होऊन आपला मतदाना हक्क बजावा आणि आपल्या विकासासाठी कटीबद्ध असलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावासमोरील धनुष्यबाणासमोरील बटण दाबूब त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, वर्षा प्रशांत ठाकूर, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक जगदीश गायकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, रुचिता लोंढे, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, आरपीआयचे किशोर गायकर, भाजपचे पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंझारराव, केदार भगत, मंगेश पडळकर, तानाजी झुगे, प्रीतम म्हात्रे, संदीप पाटील, के. सी. पाटील, मयुरेश किस्मतराव, किशोर गायकवाड, अमित ओझे, प्रसाद म्हात्रे, बाळा जाधव, मधुकर उरणकर, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, भाजप महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, सुहासिनी केकाणे, लीना पाटील, आदिती मराठे, स्वाती कोळी, मनसेचे संजय मुरकुटे, संदीप पाटील, प्रकाश लाड, विभाग अध्यक्ष मंदार पाटणकर, चंद्रकांत मंजुळे, स्नेहल खरे, संजीवनी भोईर, करुणा कानगोजे, रंजना गोगर, कोमल कोळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply