Breaking News

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची मंगळवारी पुण्यतिथी

पनवेल : रामप्रहर वृत्त
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची मंगळवारी (दि. 7) पुण्यतिथी असून यानिमित्त सकाळी 9 वाजता शेलघर येथे भगतसाहेब निवासस्थानी अभिवादन करण्यात येणार आहे.
या वेळी अभिवादन करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
स्व. भगतसाहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. 84 गावांचा न्याय निवाडा करीत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. स्व. भगतसाहेबांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातील लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ त्यांच्या अंतःकरणात कायम होती. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्व. भगतसाहेबांचे पुत्र प्रकाश भगत, अजय भगत व संजय भगत यांनी केले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply