Breaking News

करंजाडे येथील पाणीप्रश्नी आमदार महेश बालदी आक्रमक

समस्या मार्गी लावा; अन्यथा मोर्चा काढण्याचा सिडकोला इशारा

पनवेल : प्रतिनिधी
करंजाडे येथील पाणीप्रश्नी आमदार महेश बालदी यांची गुरुवारी (दि. 13) सिडको भवनात एमडी विजय सिंघल आणि पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेतील पाण्याची समस्या निकाली काढा; अन्यथा पावसाळी अधिवेशनात मलाच आपल्याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा दिला.
या बैठकीला करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, भाजपचे विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
करंजाडेचा पाणी प्रश्न निकालात न निघाल्यास पावसाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना दिला. त्यावर सिडकोचे एमडी सिंगल व पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांनी या चार दिवसांत बकरी ईद झाल्यानंतर वरून आलेल्या लाईनमधून तुम्हाला पाण्याचा सप्लाय सुरू करतो, जेणेकरून करंजाडे नोडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे आश्वासन दिले. एमजेपीच्या अधिकार्‍यांनीसुद्धा नवीन लाईनवरून सप्लाय चालू करण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच करंजाडे व पुनर्वसन नोडमधील रहिवाशांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply