Breaking News

कोलकाताकडून बंगळुरूचा धुव्वा; आयपीएलमध्ये चक्रवर्तीचा प्रभावी फिरकी मारा

अबुधाबी ः वृत्तसंस्था

फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (3/13), आंद्रे रसेल (3/9) यांनी केलेली प्रभावी गोलंदाजी आणि शुभमन गिल (48 धावा), पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर (नाबाद 41) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नऊ गडी आणि 60 चेंडू राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा डाव अवघ्या 92 धावांत आटोपला. देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 22 धावा केल्या. विराट कोहली (5), एबी डिव्हिलियर्स (0), ग्लेन मॅक्सवेल (10) यांनी निराशा केल्यामुळे बंगळुरूला तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे बंगळुरूच्या संघासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांना आता नव्या जोमाने उभे राहावे लागणार आहे.

विराटकडून मिथुनचे कौतुक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आरसीबीच्या डावाला आपल्या फिरकीत गुंडाळणार्‍या वरूण चक्रवर्तीचे फार कौतुक केले. विराटने चक्रवर्तीला भारतीय संघाचे भविष्य असे म्हटले आहे. ‘त्याने फार सुंदर गोलंदाजी केली. मी डगआऊटमध्ये बसून म्हणत होतो की वरुण आपल्यासाठी (भारतीय संघासाठी) एक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. आम्हाला तरुण खेळाडूंकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे की ज्यामुळे भारताची बेंच स्ट्रेंथ अधिक मजबूत होईल. वरुण लवकरच भारतीय संघासाठी खेळणार असून ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे,’ असे विराट म्हणाला.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः 19 षटकांत सर्व बाद 92 (देवदत्त पडिक्कल 22; आंद्रे रसेल 3/9, वरुण चक्रवर्ती 3/13) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : 10 षटकांत 1 बाद 94 (शुभमन गिल 48, व्यंकटेश अय्यर नाबाद 41; यजुर्वेंद्र चहल 1/23)

हा पराभव आमचे डोळे उघडण्यासाठी पुरेसा आहे. या खेळपट्टीवर चांगल्या भागिदारीची गरज होती. सामन्यादरम्यान एवढ्या लवकर दवबिंदूंचा परिणाम दिसून येईल असे वाटले नव्हते. आता आम्हाला कोणत्या दिशेने काम करायचेय हे ठावूक झाले. -विराट कोहली, आरसीबी कर्णधार

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply