आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल कोळीवाडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तसेच जो विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल, अशी ग्वाही दिली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, शहर अध्यक्ष अनिल भगत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, अमित ओझे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, विनायकमुंबईकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शेकापचे दिलीप शेलार, कृष्णा शेलार, अमृत भोईर, राम शेलार, प्रभाकर शेलार, विघ्नेश शेलार, राहुल शेलार, कैलास भगत, शंकर भोईर, किरण भोईर, संतोष पाटील, सानी भोईर, विजय भोईर, रोहित म्हात्रे, योगेश शेलार, संतोष शेलार, महादू शेलार, साहिल शेलार, हर्षद शेलार, अरविंद भोईर, दर्शन शेलार, साहिल शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.