Breaking News

स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचा आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा

ठाणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या 2018च्या निवडणुकीप्रमाणेच स्वाभिमान शिक्षक संघाने या निवडणुकीतही पाठिंबा दिल्याने डावखरे यांनी आभार मानले आहेत.
भाजपचे मुरबाड येथील आमदार व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले तसेच कोकणातील प्रत्येक शिक्षक मतदारापर्यंत पोहचून भाजपला मतदानाचे आवाहन करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष यादव पवार, राज्य संपर्क प्रमुख राणू बनसोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील पाटोळे, कोषाध्यक्ष विनायक जाधव, तालुका अध्यक्ष नारायण गोल्हे, भरत पांढरे, वसंत घावट, दीपक धूमाळ, रवींद्र घोडविंदे आदी उपस्थित होते.
कोकणात डिजिटल शाळा, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, शिक्षकांचे प्रश्न, पेन्शन योजना मंजुरी आदींबाबत आमदार डावखरे यांच्याकडून केला जाणारा पाठपुरावा स्तुत्य आहे, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी कौतुक केले तसेच आमदार डावखरे यांना बहुमताने विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply