कळंबोली ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी कळंबोली पोलीस स्टेशनचे शैलेश जाधव यांची भेट घेतली. आपल्या समितीचे कार्य याबद्दल चर्चा केली. शैलेश जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सर्व सभासदांची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच मुंब्रा येथे वाहतूक पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. कळंबोली पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभागाच्या जाधव यांना गुप्त बातम्या देता याव्यात म्हणून त्यांना ग्रुपला जोडण्यात आले आहे. या वेळी नवी मुंबई कळंबोली शहर अध्यक्ष विजया कदम, पनवेल तालुका अध्यक्ष प्रसाद हनुमंते, सतीश गायकवाड, संतोष गायकवाड, अविनाश बोडके आदी उपस्थित होते.