Breaking News

गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांची मुंबई विभागावर निवड

उरण ः प्रतिनिधी

अलिबाग येथे 28 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय आष्टेडो आखाडा स्पर्धेत विविध वयोगटात गोशीन रियू कराटेच्या सुयश म्हात्रे, विनया पाटील, समीक्षा पाटील, तन्वी म्हात्रे, सेजल पाटील, कल्याणी म्हात्रे, सुजित पाटील हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून त्यांची निवड सोमवारी 30 सप्टेंबर रोजी अलिबाग येथे होणार्‍या मुंबई विभागीय शालेय स्पर्धेत झाली आहे. तर सोज्वल पाटील द्वितीय क्रमांक, नेहा पाटील, मन शिवकर, यश मोकल, तमन्ना गावंड यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांना सिहान कोळी आष्टेडो आखाड्याचे उपाध्यक्ष व कराटे प्रशिक्षक गोपाळ म्हात्रे, संतोष मोकल यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ही स्पर्धा संतोष कवळे, काजळ पाटील यांनी आयोजित केली होती. सर्व विजयी स्पर्धकांचे उरण तालुक्यातून उत्स्फूर्त अभिनंदन होत आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply