Breaking News

बारापाडा मंदिराच्या कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात असलेल्या भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी या मंदिराचे काम सुरू होतानाही त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती.
बारापाडा गावात भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार व रविवारी झाला. या मंदिरास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी सदिच्छा भेट देत दर्शन घेतले. या वेळी ग्रामस्थांनी उर्वरित कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या देणगीची मागणी केली. नेहमीच सढळ हस्ते मदतीचा हात देणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा जास्त म्हणजेच दोन लाख रुपयांऐवजी अडीच लाख रुपयांची देणगी या मंदिराच्या कामासाठी दिली. त्याबद्दल ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा.लि.चे संचालक अमोघ ठाकूर, भाजपचे युवा कार्यकर्ते विद्याधर जोशी, दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश पाटील, लक्ष्मण गावंड, महेश पाटील, सुनील गावंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply