पनवेल ः रामप्रहर वृत्त
गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… अशा जयघोषात शहरातील सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या दहिहंडी उत्सावात मिडलक्लास हौंसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहाभगी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिवाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या दहीहंडी उत्सावात सहभागी होऊन हंडी फोडलेल्या मंडळांना तसेच लहान मुलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा प्रोत्साहित केले.
दहीहंडी दरम्यान वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे आनंद बालगोपाळांचा द्विगुणीत झाला. सोसायटी मित्रमंडळाची हंडी फोडण्याचा मान जय महाराष्ट्र शिवतेज व्यायाम शाळा मंडळ पनवेल कोळीवाडा यांना मिळाला. त्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित केले. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, उद्योजक राजू गुप्ते, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, संदीप पाटील, अमोघ ठाकूर यांच्यासह मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक
पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …