Breaking News

पनवेलमध्ये आमदार चषक दहीहंडी उत्सव जल्लोषात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप व युवा मोर्चा पनवेल शहर यांच्या वतीने आमदार चषक दहीहंडी उत्सव 2024चे आयोजन मंगळवारी (दि. 27) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील आवारात करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उत्सावाला भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. ही हंडी फोडण्याचा मान कोळीवाडा येथील जय महाराष्ट्र शिवतेज व्यायामशाळा मंडळाने मिळवला. त्यांना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
पनवेलमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या दहीहंडीला नागरिकांनी गर्दी जमली होती तसेच रीलस्टार श्रृतीक कोळंबेकर आणि सोनाली गुरव यांची उपस्थिती लाभली. आमदार चषक दहीहंडी उत्सवात पाच लाख 55 हजार 555 रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती तसेच या ठिकाणी सलामी देणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, चिटणीस अमरीश मोकल, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नीता माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, भाजप प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, शहर उपाध्यक्ष अमित ओझे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, विधानसभा संघटक रोहित जगताप, प्रवीण मोरबाळे, प्रशांत शेट्टे, मयूर आंग्रे, शुभम कांबळे, अक्षय सिंग, संदीप पाटील, सर्वज्ञ ठाकूर, कोमल कोळी, निकिता फडके, शिवानी घरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply