Breaking News

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या जल्लोषात

उरण ः रामप्रहर वृत्त

महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकी जेएनपीटी बंदर व घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे. न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. या गावातील गावदेवीची यात्रा 17 व 18 एप्रिलदरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली. कोरोनानंतर प्रथमच धूमधडाक्यात व भक्तीपूर्ण वातावरणात सर्व भक्तांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले, तसेच पालखी सोहळा सोमवारी (दि. 18) भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. गावचे सुपुत्र रोशन घरत याने गावातील गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक कै. अनंताबुवा यांची सुंदर रंगावली रेखाटून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर वैभव कटावते यानेही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व देवीचे सुंदर शिल्प रेखाटून मानवंदना दिली. सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, न्हावा ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष शैलेश पाटील, उपाध्यक्ष जयेंद्र पाटील, चेतन कडू, मोरेश्वर पाटील, खजिनदार गणेश भोईर, सहखजिनदार अनंत म्हात्रे, अक्षय ठाकूर, सुरेश म्हात्रे आदींसह इतर पदाधिकर्‍यांनी विशेष मेहनत घेतली. गावदेवीचे मंदिर ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून अनेक भाविक येथे दर्शनाला येतात, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply