पनवेल ः रामप्रहर वृत्त
विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दै. लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 30) पनवेलमध्ये कर्तृत्ववान महिलांचा आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10.30 वाजता होणार्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तर विशेष अतिथी म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मराठी नाट्य-सिने अभिनेते अंशुमन विचारे यांची उपस्थिती असणार आहे.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …