Breaking News

रोटरी प्रिमिअर लीगचा थरार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
 रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल बेलापूर येथे रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी स्वतः फलंदाजी आणि गोलंदाजी करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत रोटरी 3131 डिस्ट्रिक्ट अंतर्गत येणार्‍या पनवेल, पेण, उलवा, महाड, पुणे, पिंपरी, नागोठणे येथील विविध रोटरी क्लबच्या एकूण सहा संघांनी भाग घेतला. यात आदित्य फायटर्स संघाने बाजी मारली आणि लवास रॉयल्स उपविजेते ठरले.  रो. अतुल भगत याची उत्कृष्ट फलंदाज, रो. प्रीतम कैयाची उत्कृष्ट गोलंदाज, तर रो. आनंद माळीची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे माजी प्रांतपाल सर्वश्री रो. डॉ. गिरीश गुणे, रो. डॉ. शैलेश पालेकर आणि रो. सुबोध जोशी यांनी स्पर्धेस भेट देऊन आयोजक आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत करणार्‍या सर्व रोटरी परिवार सदस्य, स्वयंसेवक, प्रायोजक, देणगीदार, खेळाडू, संघमालक, प्रेक्षक यांचे रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन अध्यक्ष रो. हर्मेश तन्ना व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल अध्यक्ष रो. डॉ. आमोद दिवेकर यांनी आभार मानले. रो. देवेंद्र चौधरी यांनी स्पर्धा संयोजक समितीचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम पाहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ‘टीआयपीएल’चे सहकार्य लाभले.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply