Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून अजिवली येथे विकासकामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील अजिवली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 26 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 28) झाले.
पनवेल तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाची कामे सुरू असून नागरिकांना सुविधा देण्यासाठी त्यांचे नेहमीच प्राधान्य असते. त्यानुसार त्यांच्या 16 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून अजिवली येथे तबेला ते बौद्धवाडा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे तसेच 10 लाख रुपयांच्या निधीतून रा.जि.प. शाळा ते हसुराम माळी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते हे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, योगेश लहाने, ज्ञानेश्वर भागित, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अप्पा भागित, माजी सदस्य एम.जे. माळी, संतोष पाटील, राजेश काठावले, कल्पेश गोजे, प्रसाद पाटील, प्रमिला पाटील, काशिनाथ जाधव, जतीन भागित, सिद्धेश भागित यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply