Breaking News

वाढत्या इस्मालिक जिहादी कट्टरता व हिंसाचाराचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

देशातील वाढत्या इस्मालिक जिहादी कट्टरता व हिंसाचाराचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

अखिल भारतीय धर्मप्रसार समिती सदस्य दीपक गायकवाड, क्षेत्र संघटन प्रमुख श्रीरंग राजे, कोकण प्रांत धर्मप्रसार प्रमुख सुरेश गोखले, जिल्हा मंत्री रमेश मोगरे, जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख महेश बडेकर, प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड संयोजक कमलाकर किरडे, बळीराम डोंगरे, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश रणदिवे, अनंता हजारे, अ‍ॅड.गायत्री परांजपे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.

मागील काही महिन्यांपासून संपूर्ण देशात जिहादी वृत्तीचा धार्मिक कट्टरवाद व त्यांची नियोजनबद्ध होत असलेली आंदोलने ही दिवसेंदिवस वाढत आहेत. हिंदू नववर्ष शोभायात्रा, श्रीराम जन्मोत्सव, श्री हनुमान जयंती मिरवणुकांवर देशात वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाले, दगडफेकही झाली. कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, तरीही हिंदू समाज संयमाने शांत राहिला. पंधरा दिवसापूर्वी नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे कारण देऊन जुम्याच्या नामाजानंतर दगड फेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले व सरकारी मालमत्तेची हानी करण्यात आली. याचानुसता निषेध नाही तर त्यांच्यावर ओळख पटवून कायद्याने शासन  करण्यात यावे. पीएफआयसारख्या धर्मांध पक्षांवर त्वरित बंदी घालण्यात यावी, कट्टरपंथी धार्मिक गरळ ओकणार्‍या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply