Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय मंगळवारी (दि. 26) स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने आरक्षणाचे प्रणेते, समतावादी, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली. प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी यावेळी छत्रपती शाहू राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली तसेच छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी विचार मांडले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी, प्रा. महेश्वरी झिरपे (समन्वयक अंतर्गत गुणवत्ता कक्ष) या सर्वांनी उपस्थित राहून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक प्रतीक्षा पाटील (समन्वयक स्टाफ वेल्फेअर समिती) तसेच प्रा. प्रथमेश उदेकर व प्रा. डॉ. नीलम लोहकरे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रा. डॉ. धनवी आवटे यांनी मानले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply