पनवेल : रामप्रहर वृत्त
विरोधकांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला, मात्र महायुतीच्या सरकारने राज्यात तर कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये ही योजना यशस्वी केली. विविध योजना अंमलात आणल्या त्याचबरोबरीने पनवेलचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे माता भगिनींचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी कायम आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना दर्शना भोईर यांनी पुढे सांगितले की, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने सर्व समाजाचा विचार केला आहे. सुख दुःखात धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. पनवेलचा विकास करताना त्यांनी कधीही राजकारण केले नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजने अंतर्गत एक लाखहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळाला. त्याचबरोबरीने त्यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ’लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद कार्यक्रम आयोजित करून आनंददायी सोहळा साजरा केला.
मातृवंदन, अन्नपूर्णा, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शौचालय, उज्वला योजना, अशा विविध योजना महिलांसाठी राबविल्या जात असतानाच आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध उपक्रमे राबविले, त्यात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबीर यशस्वीपणे करत पनवेलमधील लेकींच्या आरोग्याची काळजी घेतली. निवडणूक प्रचाराचा वेग आला आहे, या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांचे शहरांबरोबरच ग्रामीण भागातही महिलांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करत भरभरून आशीर्वाद दिले जात आहे.
महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे जोरदार स्वागत झाले. आणि तजलदगतीने या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली. आज राज्यातील कोट्यवधी महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे. त्यामुळे ही योजना अशीच पुढे यशस्वीपणे चालू राहिली पाहिजे यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी महिलावर्गाला केले. त्याचबरोबरीने महायुती सरकारने या योजनेच्या रक्कमेत वाढ करणार असल्याचे जाहीर करून लाडक्या बहिणींचा आणखी विचार केल्याबद्दल सरकारचेही त्यांनी आभार मानले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …