Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ प्रभाग 17मध्ये बाईक रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त
विकसित पनवेलचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझवाती प्रचार संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूरांकडे पुन्हा एकदा पनवेलचे नेतृत्व देण्यासाठी सज्ज झाले असून प्रभाग 17मध्ये भव्य बाईक रॅली काढून जोरदार प्रचार रविवारी
(दि. 10) करण्यात आला. जनतेचा भरघोस प्रतिसाद या रॅलीदरम्यान आमदारांना लाभला.
जनतेच्या समस्या सोडवून त्यांना पाठीशी उभे राहणारे एक कर्तृत्ववान नेतृत्व असलेल्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी माहायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपुर्ण ताकदीने उतरले आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूरांचा विजयाचा चौकार मारण्यासाठी प्रभाग क्रमांक 17 मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात
आली होती.
या दरम्यान ठिकठिकाणी माता भगिनींना त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केले तसेच विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या रॅलीमध्ये तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस चारुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपीळे, माजी नगरसेविका सुशीला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष सुनील घरत, सुभाष भुजबळ, उपाध्यक्ष संदीप पाटील, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, ज्येष्ठ नेते सी.सी.भगत, अमरीश मोकल, जगदीश घरत, कमलाकर घरत, रवी नाईक, वर्षा नाईक, युवामोर्चाचे उत्तर रायडगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, मयुर कदम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply