पनवेल : वार्ताहर
आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी शिवसेना प्रणित शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना आणि चालक मालक संघटना प्रयत्नांची पराकष्टा करणार असल्याचे प्रतिपादन नुकत्याच शिवसेना पक्षाच्या वतीने आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत
त्यांनी केले आहे.
पनवेल विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा ही निवडणूक लढवित असून त्यांच्या साथीला शिवसेना हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. पनवेल शहराचा विकास करण्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पारदर्शक कारभार आणि विकासावर ठाम या सुत्रामुळे प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली असून त्यांच्या या विकासकामामुळे पनवेलचे रुप पालटत चालले आहे.
सलग चौथ्यांदा ते निवडणूक लढवित असून याही वेळी सुद्धा ते भरघोस मतांनी विजयी होतील यात तिळमात्र शंका नसून त्यांच्या साथीला आता शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (अ) ही महायुती हातात हात घालून प्रचारात उतरली असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची माहिती या वेळी उपमहानगरप्रमुख महेश सावंत यांनी दिली आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …