उरण : प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदार संघातील चिरनेर, कळंबूसरे, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, आवरे आणि गोवठणे उरण पूर्व विभागात आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतःच्या मतदार संघातील उरण पूर्व विभागातील गावागावात विविध प्रकारची विकास कामे केली असून, त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते त्यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
बालदी यांच्या प्रचार रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार महेश बालदी हे स्वतः रॅलीसाठी उपस्थित नसतांनाही भाजपाचे पूर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हातात घेऊन ज्येष्ठांसह वयोवृद्ध महिला तरुण आणि लाडक्या बहिणींना आमदारांच्या मागील पाच वर्षाच्या कामांचे प्रगती पुस्तक दाखवित एकदिलाने प्रचार करीत असल्याचे चित्र काल सर्वत्र दिसत होते. भाजपच्या विकासाचे व्हिजन पाहूनच मतदान करा, असे आवाहन येथील भाजपचे नामांकित उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांनी केले गावागावातील तमाम मतदारांना केले.
भाजपच्या कमळ निशाणीचे बटण दाबून येत्या 20 नोव्हेंबरला उरण मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांना आपले बहुमूल्य मतदान करून विकासाला मत द्या. प्रगतीला साथ द्या. हमारा नेता कैसा हो, महेश बालदी जैसा हो, महेश बालदी आगे बढो, हम तुम्हारे साथ हो. अशा घोषणाबाजी करीत भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात दणाणून सोडला होता. या प्रचार रॅलीत माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, शशिकांत पाटील, प्रदीप ठाकूर, सुशांत पाटील, भाजप युवा नेते प्रतिक गोंधळी, ग्रामपंचायतीचे सदस्य समीर डुंगीकर, माजी सदस्य रमेश फोफेरकर, जयेश खारपाटील, मुकुंद गावंड, देवेंद्र पाटील, कुलदीप नाईक, राजेश पाटील व रुपेश पाटील यांच्यासह भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …