पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले बहुमोल मत देऊन विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.
पनवेल मतदारसंघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील नेरे, नेरेपाडा, सांगटोली, मालडुंगे ग्रामपंचायतीमधील विविध वाड्या, शिवणसई, तामसई, बोंडारपाडा, दुंदरे, दुंदरेपाडा, रिटघर आणि चिंचवलीमध्ये सोमवारी सोमवारी (दि. 11) प्रचार करण्यात आला. या वेळी ठिकठिकाणी त्यांचे माता-भगिनींनी औक्षण करून स्वागत केले तसेच ज्येष्ठांनीही त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला.
या प्रचारावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, राज पाटील, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, कोप्रोलीचे माजी सरपंच रमेश पाटील, नारायण चौधरी, शांताराम चौधरी, नेरेचे माजी सरपंच वासुदेव गवते, ताई पाटील, माजी सदस्य कल्पना वाघे, चिंध्रण माजी सरपंच एकनाथ पाटील, सदस्य निलेश पाटील, गोटीराम पाटील, राजा भोईर, सुनील शेळके, प्रलय भोपी, युवा मोर्चा मंडळाचे तालुका कोषाध्यक्ष अमर शेळके, दयेश जांभळे, विठ्ठल शेळके, तुकाराम म्हसकर, संतोष शेळके, विकास भगत, विनायक भगत, अनंता पाटील, विजय शेळके, अनिल शेळके, नारायण शेळके, करण जांभळे, नामदेव डुकरे, मंगल पाटील, कचरू शेळके, शालिक शेळके, बारक्या शेळके, सुरेश शेळके, चंद्रकांत शेळके, समाधान पाटील, उमेश पाटील, गुरूनाथ भोपी, राजेश भोपी, राजन भगत, शरद भोपी, बाळकृष्ण भोपी, गणेश भोपी, बाळूबुवा भोपी, गुलाब भोपी, विष्णू चौधरी, नकुल चौधरी, विलास खारूटकर, रामदार खारूटकर, डॉ. रोशन पाटील, मिलिंद पाटील, महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, कल्पना ठाकूर, कुंदा मेंगडे, अंकित घरत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले तसेच आता या योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहेेत. त्यामुळे गतिमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मतदारांना केले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply