Breaking News

महायुतीकडून पनवेल शहर, खांदा कॉलनीत भव्य बाईक रॅली

* आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी पनवेल आणि खांदा कॉलनीमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी (दि.11) करण्यात आले होते. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईकवर झेंडे लावून घोषणा देत प्रचार केला.
पनवेलचे कार्यकुशल आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार सुरू आहे. त्यानुसार पनवेल शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते. शहरातील सोसायटी ग्राऊंड पासून या रॅलीला सुरू झाली असून पुढे गांधी हॉस्पिटल-छत्रपती शिवाजी महाराज चौक – पंचरत्न चौक-एमजी रोड-पोटे मसाला-मुसलमान नाका-विट सेंटर-साईनगर-दि. बा. पाटील साहेब बंगला-सहस्त्रबुद्धे हॉस्पीटल-पायोनियर मॉर्डन स्विट-खांदा कॉलनी भाजपा कार्यालय- साई बाबा मंदीर-किबा हॉटेल-अष्टविनायक हॉस्पीटल-श्रीकृपा हॉल-सेक्टर 6 दुर्गामाता मंदीर-मेन मार्केट-तिर्थराज सोसायटी-खांदा कॉलनी ब्रीज खालून सेक्टर 10 -सीकेटी कॉलेज आणि भाजप कार्यालयाजवळ हीची सांगता झाली. रॅलीदरम्यान जनतेचा चांगला प्रतिसाद आमदार प्रशांत ठाकूरांना लाभला.  या वेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, विश्वजीत बारणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे, शिवसेनचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण, माजी उपमहापौर सीताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष अमित ओझे, भिमराव पोवार, युवा नेते केदार भगत, मयुरेश खिस्मतराव, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, स्वप्नील ठाकूर, रोहित जगताप, देवांशु प्रभाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक सहभागी झाले होते. या बाईक रॅली दरम्यान येत्या 20 ताखेला कमला समोरील बटन दाबून आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा, असे आवाहन मतदारांना करण्यात आले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply