पनवेल : प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा देण्यात येत असल्याचे मंगळवारी (दि. 12) पनवेल येथे झालेल्या माळी समाजाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. या वेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. भाजप, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी पनवेल विधानसभा मतदार संघातील समाजातील कार्यकर्त्यांची संत सावता माळी हॉल पनवेल येथे बैठक बोलवली होती. या वेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे, प्रदेश महामंत्री वनिता लोंढे, भाजप पनवेल शहर सरचिटणीस माधव राव गांगुर्डे, ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रशांत फुलपगार, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे राकेश भुजबळ, गौरव कांडपिळे, अजय कांडपीळे
आदी उपस्थित होते. या वेळी आमदार दयानंद सोपटे यांनी महाराष्ट्रात महायुतीलाच का मते द्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. अॅड. मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. आपल्या समजला ते नेहमीच सहकार्य करीत असल्याने त्यांना 20 तारखेला कमळ या निशाणी समोरील बटण दाबून निवडून देण्याचे आवाहन केले. प्रदेश महामंत्री वनिता ताई लोंढे यांनी ही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजा तर्फे पाठिंबा देण्यात येत असल्याचे एकमताने जाहीर करण्यात आले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …