Breaking News

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी खारघरमध्ये भव्य सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 14) दुपारी 3 वाजता खारघर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर 29मधील सेंट्रल पार्कजवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेसाठी 50 हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
या सभेच्या तयारीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला जात आहे. खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे तसेच या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्वानपथकाद्वारे या जागेची तपासणी करण्यात येत आहे. सभा सुरळीत होण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply