पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
यामध्ये खोपटे गावातील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यासोबतच गुळसुंदे येथील शेकाप कार्यकर्ते, आपटा गावातील कार्यकर्ते, कालीवली गावातील कार्यकर्ते, वासांबेचे माजी प्रभारी सरपंच माधुरी भगवान जांभळेंसह कार्यकर्ते, जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मनीषा नारायण साळवी, डोलघर गावातील करण पाटील व मित्रपरिवार, आपटा येथील सकपाल कुटुंब, कडापे (आवरे) गावातील काँग्रेस पक्षाच्या माजी ग्राम पंचायत सदस्या निशाताई महेश म्हात्रे तसेच त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, मोहोपाडा येथील भव्य प्रचार सभेवेळी गुळसुंदे येथील शेकापचे चिंतामण कडवे, शिवसैनिक बजरंग भागवत, स्वप्नील चौलकर, संकेत चौलकर, विशाल उकिर्डे, सम्राट भागवत, सचिन गायकवाड, आकाश पांडे, विकी गायकवाड, समाधान गायकवाड आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपचे गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, ग्रामपंचायत सदस्य सतिश साठे तसेच संतोष साठे आदी उपस्थित होते.
यासोबतच खोपटे गावातील चांगदेव पांडुरंग ठाकूर (शेकाप), प्रशांत जगन्नाथ पाटील (राष्ट्रवादी, मच्छीमार सेल उपाध्यक्ष), गिरिधर धनाजी घरत (शेकाप), विलास चांग्या घरत, संतोष बालाकृष ठाकूर, भगीरथ परशुराम घरत, दिलीप चंग्या घरत, महेंद्र वामन ठाकूर, प्रतीक दिलीप घरत, अक्षय गणेश घरत, हरिश्चंद्र अनंत ठाकूर, निर्भय नामदेव घरत तसेच अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर
प्रवेश केला.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …