Breaking News

माणगाव तालुक्यात सात नवे कोरोनाबाधित

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली. यामध्ये नगरपंचायत हद्दीत दोन, मोर्बा येथे व इंदापूर येथेही प्रत्येकी दोन, तर कशेणे येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. तालुक्यात आतापर्यंत 32 गावांतून 116 कोरोना रुग्ण आढळले असून, त्यापैकी 67 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधित रुग्णांची संख्या 47 आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण माणगाव नगरपंचायत हद्दीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply