कळंबोली : रामप्रहर वृत्त
महायुतीच्या कार्यकर्त्यांची साथ आणि मतदारांचा विजयाचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचारादरम्यान सर्वच ठिकाणी मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून कार्यकर्तेदेखील जोमाने पनवेल मतदारसंघातील मतदार्रांपर्यत पोहचून जोरदार प्रचार करत आहे.
या अंतर्गत गुरुवारी (दि. 14) कळंबोली आणि रोडपालीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रचार करण्यात आला. या वेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, राजू शर्मा, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर तसेच अमर ठाकूर, यशवंत ठाकूर, अरुण पाटील, कृष्णा पाटील, सत्यम पाटील, रामा महानवर, अशोक मोटे, भास्कर पाटील, संतोष ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …