Breaking News

जासई विद्यालयात शिक्षक दिन साजरा

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज या शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात व सोशल डिस्टन्सिंग पाळून साजरा करण्यात आला. प्रास्ताविक रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी मान्यवरांचे स्वागत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी भूषविले. या वेळी सुरेश पाटील यांनी कोविड योद्धा म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन अध्यक्षांच्या हस्ते सन्मानित केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे हे उपस्थित होते. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक खाडे सर यांनी उपस्थित सर्व शिक्षक व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply