पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेलमध्ये जोरदार धक्का बसला आहे. पनवेल कोळीवाड्यातील ‘उबाठा’च्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व स्वीकारत भारतीय जनता पक्षामध्ये सोमवारी (दि. 18) जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले.
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत काम केले आहे. त्यांच्या या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेल कोळीवाड्यातील आकाश भोईर, नितीश भगत, अरुण पाटील, सागर भोईर, योगेश पाटील, सागर भोईर, आंबू, योगेश शेलार, संकेत भोईर, महेश भोईर,योगेश भगत, निवेश भगत, शंकर भोईर, जगदीश शेलार, संजय भगत, नरेश भोईर, गणपत भोईर, महेंद्र पाटील, शुभम भोईर, सुनील भगत, अनिकेत भगत, राज भगत, सागर भगत, यशवंत भोईर, दुर्गेश शेलार, यज्ञेश भगत, रवि भोईर, कौशिक भगत, मयुर भोईर, अनिल शेलार, पवन भगत, महेंद्र भगत, सोमनाथ भोईर, नितीन भोईर, धीरज भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, माजी नगररसेविका दर्शना भोईर तसेच गणेश भगत, हरिश्चंद्र भगत, रोशन ठाकूर, राकेश भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …