Breaking News

पनवेलमध्ये उद्या रोजगार मेळावा

अलिबाग : जिमाका

बेरोजगार उमेदवारांसाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेलच्या वतीने रविवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता पनवेल येथील के. व्ही. कन्या शाळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. या कंपन्याना दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर (रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.

रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणार्‍या उमेदवारांनी या विभागाच्या https://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी, तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करून Rojgar Melava Panvelयामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे अप्लाय करावे. यामध्ये काही अडचण आल्यास किंवा सहाय्यासाठी हेल्पलाईन 18602330133 अथवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या खालील बाजूस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधेचा उपयोग करावा.

इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षित लाभार्थी, उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच मुलाखतीस येताना स्वतःचा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतिसह मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पनवेल यांनी केले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply