Breaking News

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटे येथे अभिवादन

उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यात 1984 साली झालेल्या गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना 41व्या स्मृतीदिनी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी शुक्रवारी (दि. 17) पागोटे येथे अभिवादन केले.
शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्यात आला. या लढ्यात 17 जानेवारी 1984 रोजी पागोटे येथील महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील आणि कमलाकर कृष्णा तांडेल हे तिघे हुतात्मे झाले होते. त्यांचा स्मृतीदिन दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने पागोटे येथे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी काँग्र्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीही पागोटे येथे येत हुतात्म्यांना अभिवादन केले.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply