Breaking News

खांदा वसाहतीत झाड उन्मळून पडले

पनवेल ः वार्ताहर

बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी 5 वाजता खांदा वसाहतीतील सेक्टर 8 येथील ए टाइप बिल्डिंगलगत असलेले झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेले झाड रस्त्यावरून बाजूला केले.

सेक्टर 8 येथे सिडकोने बांधलेली ए टाइपची घरे आहेत. इमारतींच्या संरक्षण भिंतीच्या आतमध्ये सिडकोने पूर्वी झाडे लावली होती. त्यापैकी अनेक झाडे ही जुनाट झाली आहेत. बुधवारी पनवेल परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे खांदा वसाहतीतील गजानन सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये असलेले एक झाड रस्त्यावरून उन्मळून पडले. दरम्यान, मुसळधार पाऊस असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ  नव्हती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु झाड पडल्यामुळे रहदारीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला. त्यानुसार स्थानिक नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, सचिन गायकवाड, शांताराम महाडिक यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी सिडकोच्या अग्निशमन दलाला याबाबत कळवले. त्यानंतर संबंधित पथक या ठिकाणी आले आणि त्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडून काही वेळातच रस्ता मोकळा केला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply