मुरुड : प्रतिनिधी
रक्तदान ही सामाजिक चळवळ बनल्यास रक्तदात्यांमध्ये वृद्धी होईल. गरजवंतांना सहजपणे रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचू शकतील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी येथे केले.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील संजिविनी आरोग्य सेवा संस्थेने शुक्रवारी (दि.12) संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यात नगराध्यक्ष पाटील बोलत होत्या. या शिबिरात 64जणांनी रक्तदान केले.
प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक पांडुरंग आरेकर यांनी केले. कोकण युनिक फाउंडेशन अध्यक्ष डॉ. जमीर कादरी, उद्योजक दिलावर महाडकर, डॉ. मकबूल कोकाटे यांचीही या वेळी समयोचीत भाषणे झाली. मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विक्रमजित पडोळे, जमीर करदमे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध, कोषाध्यक्ष कीर्ती शहा यांच्यासह रक्तदाते व नागरिक उपस्थित होते.