Breaking News

उलवे नोडमध्ये गुरुवारपासून ‘नमो चषक’

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने 23, 24 व 25 जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
उलवे नोड सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर होणार्‍या या नमो चषकचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उपाध्यक्ष सुनील राणा, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे 1 अध्यक्ष निलेश खारकर, उलवे 2 अध्यक्ष विजय घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी व इतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती असणार आहे.
या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडाफेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा होणार असून या स्पर्धेत पाच हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 23 जानेवारीला, कबड्डी 24 व खो-खो 25 जानेवारीला आणि या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा प्रकाशझोतात, तर धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडाफेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा तीनही दिवस दिवसा होणार आहेत.
या क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना सात लाख 56 हजार रुपये, खो-खोमधील एकूण विजेत्यांना एक लाख 43,200 रुपये, कबड्डी स्पर्धेतील एकूण विजेत्यांना एक लाख 81 हजार रुपये, तर अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना चार लाख 11 हजार रुपये अशी एकूण तब्बल 14 लाख 91 हजार 200 रुपयांची रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विजेत्या खेळाडूंना भरघोस रकमेची बक्षिसे असतानाही विनामूल्य प्रवेश या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply