आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छतादूत चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत अतिक्रमण नियंत्रण गु्रप या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पनवेल महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून मानसरोवर रेल्वेस्थानकाजवळ जुई गावातील मैदानावर स्वच्छतादूत चषक 2025 या एकदिवसीय टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत मोरया इलेव्हन संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
बक्षीस वितरण समारंभाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, महादेव वाघमारे इतर पदाधिकारी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना स्वच्छतादूत हे वर्षाचे 365 दिवस काम करून महापलिका क्षेत्रातील नागरिकांना सेवा देत असतात. त्यामुळे त्यांनी कामाबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.