Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून निष्ठा वाघमारेला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील निष्ठा जितेंद्र वाघमारे या विद्यार्थिनीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) निष्ठा वाघमारे हिला सुपूर्द केला.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. निष्ठा ही एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण जॉर्जिया या देशातील एसईयु युनिव्हर्सिटीमध्ये घेणार आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यानुसार तिला मदत करण्यात आली असून मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निष्ठाचे अभिनंदन करून तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी नगरसेवीका वृषाली वाघमारे, नीता माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply