Breaking News

पॅराशूटचालकावर गुन्हा दाखल

मुरूड  ः प्रतिनिधी

शनिवारी पॅराशूटवर स्वार झालेले पुणे येथील पर्यटक गणेश पवार (40) आणि वेदांत पवार (15) या पितापुत्राचा मुरूड समुद्रकिनारी पॅराशूटवरून पडल्याने अपघात झाला होता. यात वेदांत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासन गतिमान झाले असून मुरूड पोलिसांनी या प्रकरणी पॅराशूटचालक सागर चौलकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 337, 338 व 34अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुरूड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. आज मुरूड पोलिसांनी ज्या गाडीच्या साहाय्याने पॅराशूट उडवले जायचे, ती गाडी (एमएच 06 जे 4744) ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला. या घटनेतील इतर जबाबदार व्यक्तींचीही पोलीस चौकशी करणार आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply