नगरसेवक संजय भोपी यांचे प्रयत्न

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्ती कामासाठी नगरसेवक संजय भोपी यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. 15मधील खांदा कॉलनी सेक्टर 8 मधील नवरत्न सोसायटीच्या फुटपाथवर सोसायटीतील गेटवर काही महिन्यांपूर्वी मोठे भगदाड तसेच अन्य ठिकाणी छोटेमोठे खड्डे पडले होते. वारंवार सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन नगरसेवक संजय भोपी यांनी सहा महिन्यांपूर्वी सिडकोला पत्रव्यवहार करून सातत्याने सिडकोच्या अधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा करून काम मंजूर केले होते. त्या कामाला नुकतीच सोसायटीतील पदाधिकार्यांच्या उपस्थितीत पूजन करून सुरुवात केली. या वेळी वंदे मातरम् कामगार संघटना नेते मोतीलाल कोळी, नवरत्न सोसायटी पदाधिकारी जोशी, शिलवंत चौधरी, शेट्टे, वैराळकर, कंत्राटदार हरेश भगत आदी उपस्थित होते.