Breaking News

उरण बस स्थानक झालेय समस्यांचे माहेरघर

उरण : वार्ताहर  : उरण बस स्थानक हे मुंबई विभागात मोडत असून प्रवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्या येथे आहेत. त्याकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. उरण बसस्थानक म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे, असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

उरण बस डेपोत उरण तालुक्यातील प्रवाशांची जा-ये सुरू असते. डेपोमध्ये कॅन्टिन नाही. प्रवाशांसाठी थंड पाण्याचे कूलर आहे, परंतु त्यांचे नळ लिकेज असल्याने पाणी वाया जात आहे. कूलरच्या भोवताली कमालीची घाण, कूलरसमोरच कुत्र्यांची दहशत, वेळी-अवेळी गाड्या, गाड्या वेळेवर न सुटणे, दुपारच्या वेळेत गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी करणे, शौचालयात कमालीची अस्वच्छता, गाड्यांना बोर्ड नसणे अशा समस्यांकडे उरण बस आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply