Breaking News

सिडकोमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा

पाणी फाऊंडेशनला अडीच लाखाची देणगी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या कार्यामागच्या प्रेरणेचे मूळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दास्यमुक्तीच्या विचारांमध्येच आहे, असे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. सिडको भवन, बेलापूर येथे 28 मे 2019 रोजी सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन व सिडको एम्प्लॉईज युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती महोत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

या वेळी सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन आणि सिडको एम्प्लॉईज युनियन यांच्या पुढाकाराने सिडकोच्या वतीने पाणी फाऊंडेशनच्या कार्याकरिता अडीच लाख रुपयांचा धनादेश डॉ. गिरीश कुलकर्णी यांना सुपूर्द करण्यात आला. या वेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, तर सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद बागुल हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे आर. बी. धायटकर, फैय्याज खान, नीलेश तांडेल, जे. टी. पाटील, विनोद पाटील, श्री. सरोदे आणि महामंडळातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र हिरे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती प्रिया रातांबे यांनी केले आणि आभार ज्ञानेश्वर भोईर यांनी मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply